पुणे– लय, अदा, नृत्य यांचा त्रिवेणी संगम असलेल्या पारंपारिक ,बैठकीच्या ठसकेबाज लावण्या…रसिकांनी टाळया आणि शिट्या वाजवून दिलेली भरभरून दाद अशा जल्लोषपूर्ण वातावरणात लावणी महोत्सव यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात संपन्न झाला.

पुणे फेस्टिवल अंतर्गत लावणी सम्राज्ञी अर्चना जावळेकर, यांचा ‘लावणी अप्सरा’ हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात संपन्न झाला. पुरुषांप्रमाणेच महिलांनी कलावंतांना दाद दिली.

लाडाची ग लाडाची, मी कैरी पाडाची…, या रावजी, बस भावजी…, सोडा राया सोडा हा नाद्खुळा…., ही nmoir साजूक तुपातली…,तुमच्या पुढ्यात कुटते मी, ज्वानीचा मसाला….जरा खाजवाकी, यांसारख्या जुन्या आणि नव्या लावण्याचे बतावणीसह सादरीकरण तसेच ‘फँड्री’चित्रपटातील गाजलेले ‘तुझ्या प्रीतीचा इंचू चावला’ या गाण्यावरील अॅटमसॉंग, लोकगीते यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. माया खुटेगावकर, संगीता लाखे, अर्चना जावळेकर, स्वाती दसवडकर या कलावंतांची थिरकलेली पाऊले आणि त्यांच्या लय, अदाकारीने प्रेक्षकांना घायाळ केले. टाळ्या, शिट्या आणि वन्समोअरने प्रेक्षकांनी नाट्यगृह डोक्यावर घेतले.

माजी नगरसेवक दामोदर कुंबरे, कार्यकारी अभियंता श्रीकृष्ण चौधरी, सामाजिक कार्यकर्ते विशाल भेलके, माजी पंचायत समिती सदस्य सचिन गदादे पाटील यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

DSC_1720 DSC_1726 DSC_1730 Untitled-1

 

àdrU à. dmqi~o

_r{S>`m H$mo Am°{S>©ZoQ>a

98224 54234

admin

Comments are closed.