Maya Khutegaokar

Archana Javdekar

Sangeeta Lakhe

Maya Khutegaokar 1

 

नाच, गाणं आणि अदाकारीच्या त्रिवेणी संगमाने रसिक चिंब

पुणे- सोडा सोडा राया हा नाद्खुळा .. बाई मी लाडाची ग लाडाची, कैरी पाडाची…, आबा जरा सरकून बसा की जरा…,गेली कुठ घावना, बोलल्या बिगर राव्ह्ना…., तुमच्या पुढ्यात कुटते मी ज्वानीचा मसाला…, अशा एकास एक सरस, नाच, गाणं आणि अदाकारीचा त्रिवेणी संगम असलेल्या लावण्यांनी रसिकांना आज तृप्त केले.

पुणे फेस्टिवल अंतर्गत लावणी सम्राज्ञी संगीता लाखे, अर्चना जावळेकर आणि सहकारी यांचा लावणी महोत्सव २०१५ हा कार्यक्रम कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रंगला. रसिकांच्या टाळया, शिट्या आणि वन्समोरने नाट्यगृह दणाणून सोडले.

अर्चना जावळेकर यांच्या ‘दूर उभे का जवळ याना, मला वाटते भीती…, सोडा सोडा राया हा नादखुळा…’, तसेच ‘ही पोरगी साजूक तुपातली…, या कोळी गीतावर केलेल्या नृत्याला प्रेक्षकांनी दाद दिली. संगीता लाखे यांच्या ‘आबा जरा सरकून बसा…’ लाडाची ग लाडाची कैरी पाडाची.., प्राची मुंबईकर य्च्नच्या तुमच्या पुढ्यात कुटते मी, ज्वानीचा मसाला…., आंबा तोतापुरी.. यांसारख्या जुन्या आणि नव्या लावण्याचे बतावणीसह सादरीकरण तसेच ‘फँड्री’चित्रपटातील गाजलेले ‘तुझ्या प्रीतीचा इंचू चावला’ या गाण्यावरील अॅटमसॉंग, लोकगीते यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.’शांताबाय…या लोकगीतावर सविता दसवडकर यांच्या प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या नृत्य अदाकारीने तीन वेळा वन्समोर मिळवत नाट्यगृह दणाणून सोडले. संगीता लाखे, अर्चना जावळेकर, स्वाती दसवडकर, प्राची मुंबईकर या कलावंतांची थिरकलेली पाऊले आणि त्यांच्या लय, अदाकारीने भरलेल्या लावण्या बघण्यासाठी स्रियांनीही गर्दी केली होती.

पुणे फेस्टिवलच्या २५ वर्षांच्या कारकीर्दीचा चित्ररूपी आढावा घेणाऱ्या ‘कॉफी टेबल बुक’ मध्ये अर्चना जावळेकर यांची दोन उत्कृष्ट छायाचित्र आहेत. हे पुस्तक यावेळी अर्चना जावळेकर यांना पोतदार यांच्या हस्ते देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. इतर कलाकारांचा सत्कार पुणे फेस्टिवल यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचे प्रमुख अतुल गोंजारी, तानाजी चव्हाण, नरेंद्र काते व सुहास रानवडे यांच्या हस्ते करण्यात आला. पुणे फेस्टिवलच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे समन्वयक मोहन टिल्लू हे यावेळी उपस्थित कलर्स मराठी वाहिनी हे पुणे फेस्टिवलचे मुख्य प्रायोजक आहेत.

admin

Comments are closed.