unnamed-38
पुणे :
अपूर्व उत्साहात सोमवारी दुपारी 28 व्या ‘पुणे फेस्टिव्हल’ ची ‘मिस पुणे फेस्टिव्हल’ स्पर्धा रंगली

! ‘अपूर्वा चव्हाण’ यांनी ‘मिस पुणे फेस्टिव्हल’ किताब पटकावला, तर तन्वी खरोटे, सुरभी आगरवाल उपविजेत्या ठरल्या. स्पर्धेचे हे चौथे वर्ष होते.

या स्पर्धेत एकूण 60 स्पर्धक युवती सहभागी झाल्या होत्या. ऑडिशन्स्नंतर 20 स्पर्धकांची निवड करण्यात आली. गणेश कला-क्रीडा केंद्रात झालेल्या या कार्यक्रमाला पुणेकरांनी तुडुंब गर्दी केली. ‘पुणे फेस्टिव्हल’ चे अध्यक्ष सुरेश कलमाडी तसेच संयोजक सुप्रिया ताम्हणे यांची प्रमुख उपस्थिती होती. रॅम्प वॉकलाही उपस्थितांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.
‘मिस इंडिया स्कूबा इंटरनॅशनल’ व ‘फॅशन दीवा 2015’ वर्षा राजखोवा प्रशांत गिरकर (चित्रपट दिग्दर्शक), प्रशांत पाटील आणि बंटी देशपांडे (फॅशन डिझायनर) यांनी परीक्षण केले. या कार्यक्रमाचे प्रायोजक ‘धागा डिझायनर स्टोअर’चे अनुपम जोशी, ‘मेक अप अ‍ॅण्ड हेअरस्टाईल संस्कृताज् ब्युटी स्टुडिओ अ‍ॅण्ड स्पा’ हे होते.
एकूण चार फेर्‍या या स्पर्धेमध्ये होत्या. त्यातील ‘रॉयल महाराष्ट्र’-प्रथम फेरी, ‘ब्युटीज् इन ब्लॅक’ -द्वितीय फेरी, ‘हुर ए जन्नत’- तृतीय फेरी तर चौथी फेरी ‘टॉप टेन राऊंड’ अशी होती. ‘मिस इंडिया स्कूबा इंटरनॅशनल’ विजेत्या वर्षा राजखोवा यांच्या हस्ते ‘मिस पुणे फेस्टिव्हल’ चा मुकूट विजेत्या आणि उपविजेत्यांना प्रदान करण्यात आला.
बेस्ट टॅलेंट -दिक्षा रैना, बेस्ट हेअर – रोमा राऊत, बेस्ट  स्माईल- ऐश्‍वर्या देव, मिस फोटोजेनिक इशा कडू, मिस फेव्हरेट -सुरभी आगरवाल म्हणून यांची निवड झाली.
2-10
1-16

admin

Comments are closed.