पुणे :
दूरदर्शनचे ज्येष्ठ निर्माते अरुण काकतकर यांनी ध्वनीचित्रफित, आठवणी, किस्से या माध्यमातून रविवारी मराठी सांस्कृतिक विश्वातील दिग्गज “नक्षत्रांचे दिवस’ उलगडले!
निमित्त होते 28 व्या “पुणे  फेस्टिव्हल’ मधील “नक्षत्रांचे दिवस’ या कार्यक्रमाचे ! रविवारी दुपारी हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे झाला.
संजय गोखले यांनी पूर्वार्धात श्री. काकतकर यांच्याशी संवाद साधला. प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी उत्तरार्धात काकतकरांना  गप्पातून बोलत होते.
प्रसिद्ध व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्या हस्ते अरुण काकतकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रंगमंचावर “सकाळ’चे सहयोगी संपादक सुनील माळी, “पुणे  फेस्टिव्हल संयोजन’ सदस्य मोहन टिल्लू, अतुल गोंजारी उपस्थित होते.
मराठी सारस्वत, सांस्कृतिक आणि चित्रपट विश्वातील अनेक दिग्गजांच्या मुलाखती, कार्यक्रम, गीते, अरुण काकतकर यांनी मुंबई दूरदर्शनसाठी रेकॉर्ड केले होते. निर्मिती ही केली होती. त्यातील दुर्मिळ क्षण त्यांनी आज पुन्हा जिवंत केले.
गो. नि. दांडेकर छोटी मृणाल कुलकर्णी, राम शेवाळकर, शांता शेळके, लता मंगेशकर, आशा भोसले आणि भगिनी, जयंत नारळीकर, सुधीर मोघे, देवकी पंडीत अशा अनेकांच्या जुन्या चित्रफिती रसिकांना या कार्यक्रमात पाहता आल्या. तेव्हा बालकलाकार असलेल्या मृणाल, देवकी यांना या चित्रफितीतून पाहता आले. शिवाजी सावंत अशा दिग्गजांच्या मुलाखती पाहता आल्या.  वाद्य, पेटी, गायक मुद्रा, अशाा विविध प्रसंगी कॅमेरा माईक लावण्याचे तंत्र आम्ही विकसित करत गेलो. अनेक दिग्गजांना डॉक्युमेंटेशनचे महत्त्व कळाले, अनेक नाठाळांनी नकार दिला, असेही काकतकर यांनी सांगितले.
photo-1 photo-2

admin

Comments are closed.