admin

ऊर्जायुक्त कथक बॅलेला रसिकांची भरभरून दाद

Sep 15, 2016
दिवसाच्या दुसर्‍या सत्रामध्ये श्री कृष्णाच्या जीवनावर आधारित ‘कृष्ण संकीर्तन’ हा कथक नृत्याविष्कार ऋजुता सोमण आणि त्यांच्या सहकार्‍यांनी सादर केला.

श्रीकृष्णाच्या लीला सर्वांना परिचित आहेतच. त्यांच्या जीवनातील प्रसंग कथक नृत्याविष्काराने सादर करण्यात आले. ऋजुता सोमण आणि त्यांच्या सहकार्‍यांनी श्री कृष्णाचे जीवन प्रसंग सादर करून टाळ्यांच्या कडकडाटाने रसिकांची दाद मिळविली. या कार्यक्रमाचे संयोजन अतुल गोंजारी, नरेंद्र काते आणि रविंद्र दुर्वे यांनी केले. रविंद्र दुर्वे आणि सहकार्‍यांनी कलाकारांचा सत्कार केला.

201609141016549317_kathak-ballet-fans-appreciated_secvpf-gif
Read More

‘पुणे फेस्टिवल’च्या एकपात्री हास्योत्सवात हशा-टाळ्यांची बरसात !

Sep 14, 2016
सदानंद चांदेकर, मकरंद टिल्लू, दिलीप हल्याळ, विश्‍वास पटवर्धन, म्हाळसाकांत कौसडीकर यांचा दमदार सहभाग
 
एमपीसी न्यूज – 28 व्या ‘पुणे फेस्टिवल’चे प्रमुख आकर्षण असलेला ‘एकपात्री कलाकारांचा हास्योत्सवा’ मध्ये सोमवारी हशा-टाळ्यांची बरसात झाली. त्यामुळे बालगंधर्व रंगमंदिर रसिकांच्या प्रतिसादाने दणाणून गेले. 
 
 
नामवंत ज्येष्ठ एकपात्री कलाकार सदानंद चांदेकर, विश्‍वास पटवर्धन, दिलीप हल्याळ, महेंद्र गणपुले, मकरंद टिल्लू  यांच्यासमवेत म्हाळसाकांत कौसडीकर या नवोदित कलाकारांनीही रसिकांची मने जिंकली. ‘हसायदान फाऊंडेशन’च्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
एकपात्री कलाकारांना समाजात मिळणारा चित्रविचित्र प्रतिसाद, कार्यक्रमादरम्यान येणारे चाहत्यांचे गमतीदार अनुभव आणि शाळू सोबत्यांचे किस्से सांगून सदानंद चांदेकर यांनी सभागृह डोक्यावर घेतले. ‘आनंद वाटत जगणे हेच श्रेष्ठ जगणे’ असा संदेशही त्यांनी दिला.
‘हसण्यामुळे कलाकार लठ्ठ होतो, आणि हसताना प्रेक्षक सुंदर दिसतात’ असे सांगत दिलीप हल्याळ यांनी घरातील सदस्यांसह अनेक किस्से, विनोद सांगून दाद मिळविली.
‘आवाजांचा बादशहा’ असलेल्या महेंद्र गणपुले यांनी सनई वादनाचा मंगल आवाजापासून सुरुवात करून बप्पी लहरींच्या डिस्को ड्रमपर्यंत अनेक आवाज हुबेहूब काढून रसिकांना चकीत केले. चित्रपटांची गमतीशीर नावे, गाण्यातील अर्थहीन शब्द अशा अनेक विसंगतींवर बोट ठेवत त्यांनी मनोरंजन केले.
युवा एकपात्री कलाकार म्हाळसाकांत कौसडीकर यांनी मराठवाड्यातील लग्नघरी घडणार्‍या गमतीशीर प्रसंगांना स्त्री-पुरुष अशा दोन्ही भूमिकातून जिवंत केले. सदानंद चांदेकर यांनी त्याला रोख बक्षीस दिले. विश्‍वास पटवर्धन यांनी राशींच्या, व्यक्तींच्या गमतीजमती सांगितल्या. मकरंद टिल्लू यांनी खुमासदार सूत्रसंचालन करून रसिकांची मने जिंकली. मोहन टिल्लू यांनी आभार मानले.
ac6903f6038d7f4f30ca2d4aee05487b_l
Read More

पुणे फेस्टिवलमध्ये उर्जायुक्त कथक बॅलेला रसिकांची भरभरून दाद कृष्ण संकीर्तनातून श्रीकृष्णाच्या जीवनाचे दर्शन

Sep 14, 2016

unnamed-40

पुणे :
   28 व्या ‘पुणे फेस्टिवल’मध्ये शिव ओम ‘कथक बॅले’ चे सादरीकरण करण्यात आले. सोमवारी यास्मिन सिंग -रायपूर व सहकारी यांनी सादर केलेल्या अत्यंत उर्जायुक्त या ‘कथक बॅले’ला रसिकांनी भरभरून साथ दिली. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे हा कार्यक्रम सादर करण्यात आला.
दिवसाच्या दुसर्‍या सत्रामध्ये श्री कृष्णाच्या जीवनावर आधारित ‘कृष्ण संकीर्तन’ हा कथक नृत्याविष्कार ऋजुता सोमण आणि त्यांच्या सहकार्‍यांनी सादर केला.
श्रीकृष्णाच्या लीला सर्वांना परिचित आहेतच. त्यांच्या जीवनातील प्रसंग कथक नृत्याविष्काराने सादर करण्यात आले. ऋजुता सोमण आणि त्यांच्या सहकार्‍यांनी श्री कृष्णाचे जीवन प्रसंग सादर करून टाळ्यांच्या कडकडाटाने रसिकांची दाद मिळविली. या कार्यक्रमाचे संयोजन अतुल गोंजारी, नरेंद्र काते आणि रविंद्र दुर्वे यांनी केले. रविंद्र दुर्वे आणि सहकार्‍यांनी कलाकारांचा सत्कार केला.
unnamed1-14
unnamed2-2
Read More

अपूर्वा चव्हाण ठरली ‘मिस पुणे फेस्टिवल 2016’ ‘मिस इंडिया स्कूबा इंटरनॅशनल’ वर्षा राजखोवा यांच्या हस्ते सन्मान

Sep 14, 2016
unnamed-38
पुणे :
अपूर्व उत्साहात सोमवारी दुपारी 28 व्या ‘पुणे फेस्टिव्हल’ ची ‘मिस पुणे फेस्टिव्हल’ स्पर्धा रंगली

! ‘अपूर्वा चव्हाण’ यांनी ‘मिस पुणे फेस्टिव्हल’ किताब पटकावला, तर तन्वी खरोटे, सुरभी आगरवाल उपविजेत्या ठरल्या. स्पर्धेचे हे चौथे वर्ष होते.

या स्पर्धेत एकूण 60 स्पर्धक युवती सहभागी झाल्या होत्या. ऑडिशन्स्नंतर 20 स्पर्धकांची निवड करण्यात आली. गणेश कला-क्रीडा केंद्रात झालेल्या या कार्यक्रमाला पुणेकरांनी तुडुंब गर्दी केली. ‘पुणे फेस्टिव्हल’ चे अध्यक्ष सुरेश कलमाडी तसेच संयोजक सुप्रिया ताम्हणे यांची प्रमुख उपस्थिती होती. रॅम्प वॉकलाही उपस्थितांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.
‘मिस इंडिया स्कूबा इंटरनॅशनल’ व ‘फॅशन दीवा 2015’ वर्षा राजखोवा प्रशांत गिरकर (चित्रपट दिग्दर्शक), प्रशांत पाटील आणि बंटी देशपांडे (फॅशन डिझायनर) यांनी परीक्षण केले. या कार्यक्रमाचे प्रायोजक ‘धागा डिझायनर स्टोअर’चे अनुपम जोशी, ‘मेक अप अ‍ॅण्ड हेअरस्टाईल संस्कृताज् ब्युटी स्टुडिओ अ‍ॅण्ड स्पा’ हे होते.
एकूण चार फेर्‍या या स्पर्धेमध्ये होत्या. त्यातील ‘रॉयल महाराष्ट्र’-प्रथम फेरी, ‘ब्युटीज् इन ब्लॅक’ -द्वितीय फेरी, ‘हुर ए जन्नत’- तृतीय फेरी तर चौथी फेरी ‘टॉप टेन राऊंड’ अशी होती. ‘मिस इंडिया स्कूबा इंटरनॅशनल’ विजेत्या वर्षा राजखोवा यांच्या हस्ते ‘मिस पुणे फेस्टिव्हल’ चा मुकूट विजेत्या आणि उपविजेत्यांना प्रदान करण्यात आला.
बेस्ट टॅलेंट -दिक्षा रैना, बेस्ट हेअर – रोमा राऊत, बेस्ट  स्माईल- ऐश्‍वर्या देव, मिस फोटोजेनिक इशा कडू, मिस फेव्हरेट -सुरभी आगरवाल म्हणून यांची निवड झाली.
2-10
1-16
Read More

अरुण काकतकरांच्या आठवणींतून उलगडले मराठी सांस्कृतिक विश्वातील “नक्षत्रांचे दिवस’

Sep 13, 2016
पुणे :
दूरदर्शनचे ज्येष्ठ निर्माते अरुण काकतकर यांनी ध्वनीचित्रफित, आठवणी, किस्से या माध्यमातून रविवारी मराठी सांस्कृतिक विश्वातील दिग्गज “नक्षत्रांचे दिवस’ उलगडले!
निमित्त होते 28 व्या “पुणे  फेस्टिव्हल’ मधील “नक्षत्रांचे दिवस’ या कार्यक्रमाचे ! रविवारी दुपारी हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे झाला.
संजय गोखले यांनी पूर्वार्धात श्री. काकतकर यांच्याशी संवाद साधला. प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी उत्तरार्धात काकतकरांना  गप्पातून बोलत होते.
प्रसिद्ध व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्या हस्ते अरुण काकतकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रंगमंचावर “सकाळ’चे सहयोगी संपादक सुनील माळी, “पुणे  फेस्टिव्हल संयोजन’ सदस्य मोहन टिल्लू, अतुल गोंजारी उपस्थित होते.
मराठी सारस्वत, सांस्कृतिक आणि चित्रपट विश्वातील अनेक दिग्गजांच्या मुलाखती, कार्यक्रम, गीते, अरुण काकतकर यांनी मुंबई दूरदर्शनसाठी रेकॉर्ड केले होते. निर्मिती ही केली होती. त्यातील दुर्मिळ क्षण त्यांनी आज पुन्हा जिवंत केले.
गो. नि. दांडेकर छोटी मृणाल कुलकर्णी, राम शेवाळकर, शांता शेळके, लता मंगेशकर, आशा भोसले आणि भगिनी, जयंत नारळीकर, सुधीर मोघे, देवकी पंडीत अशा अनेकांच्या जुन्या चित्रफिती रसिकांना या कार्यक्रमात पाहता आल्या. तेव्हा बालकलाकार असलेल्या मृणाल, देवकी यांना या चित्रफितीतून पाहता आले. शिवाजी सावंत अशा दिग्गजांच्या मुलाखती पाहता आल्या.  वाद्य, पेटी, गायक मुद्रा, अशाा विविध प्रसंगी कॅमेरा माईक लावण्याचे तंत्र आम्ही विकसित करत गेलो. अनेक दिग्गजांना डॉक्युमेंटेशनचे महत्त्व कळाले, अनेक नाठाळांनी नकार दिला, असेही काकतकर यांनी सांगितले.
photo-1 photo-2
Read More

पुणे फेस्टिवल’मधील विविध स्पर्धांचे निकाल जाहीर

Sep 13, 2016
साराह शिपचंदलेर आणि निखिल कदम ठरले ‘व्हॉइस ऑफ पुणे’ !
 
पुणे :
28 व्या ‘पुणे फेस्टिवल’मध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे निकाल जाहीर झाले आहे. यामधे महिला महोत्सवातंर्गत पाककला स्पर्धा, उखाणे स्पर्धा आणि मेहंदी तसेच ‘व्हॉईस ऑफ पुणे’ या स्पर्धाचे निकाल जाहीर करण्यात आले असून, विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. सर्व स्पर्धांना उत्तम प्रतिसाद मिळाला.
पाककला, उखाणे स्पर्धा आणि मेहंदी स्पर्धा या तिन्ही स्पर्धांमधे प्रथम, द्वितीय, तृतीय आणि दोन उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. पाककला स्पर्धेसाठी ‘पूना गेस्ट हाऊस’चे किशोर सरपोतदार आणि ‘विष्णु जी की रसोई’ आणि ‘खाऊची बाराखडी’च्या रचना पाटील यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. मेहंदी स्पर्धेसाठी ‘अनमोल कला’चे अनमोल सर आणि चित्रकार अंजली पिंगळे यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. तर उखाणा स्पर्धेसाठी विद्या देसाई आणि मंगल बोरावके यांनी परीक्षक म्हणुन काम पहिले. यावेळी अभिनेत्री माधवी मोरे, कार्यक्रमाचे सहाय्यक ‘ओलीटो मल्टि स्पेशलिटी क्लिनिक’चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश सिंग, ‘कलाक्षेत्रम सिल्क’चे सागर शेठ, ‘मदर्स रेसिपी’च्या वतीने अमित कुलकर्णी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. शोभा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.कार्यक्रमाचे संयोजन दिपाली पांढरे आणि संयोगिता कुदळे यांनी केले होते.
स्पर्धांचा निकाल पुढीलप्रमाणे : 
1) पाककला स्पर्धा : 
मोनाली जैन- प्रथम क्रमांक
रूची बोरा- द्वितीय क्रमांक
शशिकला बाहेती – तृतीय क्रमांक
वर्षा दोभाडा- उत्तेजनार्थ (1)
विद्या गुप्ते – उत्तेजनार्थ (2)
2) उखाणा स्पर्धा – 
अनघा जगदाळे – प्रथम क्रमांक
मीनल ठिपसे- द्वितीय क्रमांक
आशा बागरेचा – तृतीय क्रमांक
अंजली जोशी – उत्तेजनार्थ (1)
मीना अवचट – उत्तेजनार्थ (2)
3) मेहंदी स्पर्धा –
सारीका भोकरे – प्रथम क्रमांक
श्‍वेता चव्हाण – द्वितीय क्रमांक
श्‍वेता शेटे – तृतीय क्रमांक
फरहाना शेख – उत्तेजनार्थ (1)
शुभांगी – उत्तेजनार्थ (2)
‘निवेदिता प्रतिष्ठान’च्या सहकार्याने आयोजित ‘व्हॉईस ऑफ पुणे ’ स्पर्धेमध्ये 150 स्पर्धक प्रथम फेरीत सहभागी झाले होते.  स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ व्हायोलिन वादक पंडित प्रभाकर जोग, संगीतकार हर्षित अभिराज, सहाय्यक पोलिस आयुक्त शशिकांत शिंदे, मोहनकुमार भंडारी, अनुराधा भारती यांच्या उपस्थितीत झाले. या स्पर्धेचे परिक्षण संगीतकार हर्षित अभिराज, निळकंठ कुलकर्णी, प्रविण कन्नम, अली हुसेन यांनी केले. तर माधुरी ढमाले यांनी सुत्रसंचालन केले. ‘निवेदिता प्रतिष्ठान’ अध्यक्ष अनुराधा भारती आणि सत्य भारती यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. ही स्पर्धा चाळीस वयोगटा आतील व चाळीस वयोगटा पुढील महिला आणि पुरूषांसाठी ‘व्हॉईस ऑफ पुणे’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेचा निकाल : 
चाळीस वयोगटा आतील महिला गट : 
सराह शिपचंदलेर- प्रथम क्रमांक,
श्रृती शशीधरन- द्वितीय क्रमांक,
 चाळीस वयोगटा आतील पुरूष गट  : 
निखिल कदम – प्रथम क्रमांक
पुष्कर वेदपाठक – द्वितीय क्रमांक
 चाळीस वयोगटा पुढील महिला गट  : 
उलका वैश्णव – प्रथम क्रमांक
मनिषा शास्त्री – द्वितीय क्रमांक
 चाळीस वयोगटा पुढील पुरुष गट  :
प्रफुल्ल देशपांडे – प्रथम क्रमांक
सुरेश काळे – द्वितीय क्रमांक
या सर्व स्पर्धकातून साराह शिपचंदलेर आणि निखिल कदम हे दोघे ‘व्हॉइस ऑफ पुणे’ निवडण्यात आले .
img-20160912-wa0021-1
Read More

‘पुणे फेस्टिवल’मधील क्रीडा स्पर्धेस उत्तम प्रतिसाद

Sep 13, 2016
28  व्या ‘पुणे फेस्टिवल’ मध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गोल्फ स्पर्धा, कुस्ती स्पर्धा, रोल बॉल स्पर्धांचा समावेश होता.
‘गोल्फ कप 2016’ स्पर्धेत तनय नेगी यांनी सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. त्यांना 76 गुण मिळाले.  ब्राँझ या दिव्यांग गटात अनन्या गर्ग (47 गुण) यांनी प्रथम, आर. एस. नणेशकर यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. ‘सिल्व्हर’ या दिव्यांग गटात सुशांत खोसला (37 गुण) मिळवून प्रथम ठरले, तर जे. बी. यॉन (37) गुण मिळवून द्वितीय ठरले. अभिनेत्री वर्षा उसगांवकर, ‘ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्ट’ चे संचालक रोहन सेवलेकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन विजेत्यांचा गौरव करण्यात आला. प्रसन्न गोखले यांनी स्पर्धेचे संयोजन केले.
  ‘लॉगेस्ट ड्राइव्ह ऑन होल 16’ साठी विशेष पारितोषिक सागर टेंबे (250 यार्ड 55 इंच) यांना देण्यात आले. ‘निअरेस्ट टू पीन’साठी विशेष पारितोषिक जयेन शहा (7 फूट 4 इंच) यांना देण्यात आले.
पुणे फेस्टिवल अंतर्गत कुस्ती स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्र कुस्ती संघटनेचे बाळासाहेब लांडगे, प्रसन्न गोखले, प्रदीप भोसले, ज्ञानेश्‍वर मांगडे, श्यामराव थिटे, अमरदीप चानगुडे, अविनाश गव्हाणे, महेश मोहोळ, पंकज हरपुडे यांच्या उपस्थितीत झाले. ही स्पर्धा मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल (कात्रज) येथे पार पडली. स्पर्धेमध्ये 61 किलो वजनी गटात अक्षय चोरघे -प्रथम क्रमांक, अक्षय चांदगुडे -द्वितीय क्रमांक. 65 किलो वजनी गटात सुरज टकले (बारामती) प्रथम क्रमांक, रवी गोरड (भोर) द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. तर 74 किलो वजनी गटात महाराष्ट्र केसरी केवल भिंगारे -प्रथम क्रमांक, तर बजरंग शेळके यांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. ओपन स्पर्धेत तेजस वांजळे प्रथम क्रमांक, आकाश निवंगुणे द्वितीय क्रमांक.
रोल बॉल स्पर्धेचे उद्घाटन भाजपाच्या आमदार मेधा कुलकर्णी, ‘रोल बॉल असोसिएशन’चे राजू दाभाडे यांच्या उपस्थितीत झाले. स्पर्धेसाठी महेश विद्यालयाचे विश्‍वस्त श्री. बजाज यांचे मोलाचे सहकार्य लाभले. ही स्पर्धा ‘महेश विद्यालय’, कोथरूड येथे पार पडली. आठ मुलांचे आणि आठ मुलींचे संघ सहभागी झाले होते. एकूण शंभर स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेमध्ये विद्या निकेतन शाळेने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले.
varsha-usgavkar-golf-paritoshik-new

पुणे फेस्टिव्हलच्या ’गोल्फ कप’ स्पर्धेत विजेता तनय नेगी ला गोल्फ स्पर्धेतील ट्रॉफी वितरण करताना अभिनेत्री वर्षा उसगांवकर

rollball-photo

रोल बॉल स्पर्धेचे उद्घाटन भाजपाच्या आमदार मेधा कुलकर्णी, ‘रोल बॉल असोसिएशन’चे राजू दाभाडे यांच्या उपस्थितीत झाले.

q8a6649

पुणे फेस्टिव्हलच्या ’गोल्फ कप’ स्पर्धेत विजेती अनन्या गर्ग हीला गोल्फ स्पर्धेतील ट्रॉफी वितरण करताना अभिनेत्री वर्षा उसगांवकर

kusti-photo-3

कुस्ती स्पर्धा -३

kusti-photo-2

कुस्ती स्पर्धा -१

kusti-photo-1

Read More

‘व्हॉईस ऑफ पुणे फेस्टिवल’ स्पर्धेचे उद्घाटन

Sep 12, 2016
पं.प्रभाकर जोग, हर्षित अभिराज, मोहनकुमार भंडारी यांचा सत्कार
पुणे :
28 व्या ‘पुणे  फेस्टिव्हल’ मध्ये निवेदिता प्रतिष्ठानच्या सहकार्याने रविवारी व्हॉईस ऑफ पुणे फेस्टिवल स्पर्धा संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीने आणि युवा गायकांच्या दमदार सहभागाने रंगली बालगंर्धव रंगमंदीर येथे रविवारी दुपारी या स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ व्हायोलिन वादक पंडित प्रभाकर जोग, संगीतकार हर्षित अभिराज, सहाय्यक पोलिस आयुक्त शशिकांत शिंदे, मोहनकुमार भंडारी, अनुराधा भारती यांच्या उपस्थितीत झाले.
या स्पर्धेत 150 स्पर्धक प्रथम फेरीत सहभागी झाले होते. 25 गायकांची अंतिम फेरी रविवारी दुपारी झाली. यावेळी सत्य भारती, अनुराधा शिंदे, अली हुसेन, धनंजय इंगळे, संदीप पाचवडकर, दीपक महाजन, श्रीकांत कांबळे, रफीक मणीयार उपस्थित होते .
संगीतकार हर्षित अभिराज, निळकंठ कुलकर्णी, प्रविण कन्नम, अली हुसेन यांनी परिक्षण केले. माधुरी ढमाले यांनी सुत्रसंचालन केले.
dsc04340 dsc04334 dsc04329
Read More

‘पुणे फेस्टिव्हल’ च्या कार्यक्रमांना दि. ६ सप्टेंबर पासून प्रारंभ, दि. ९ सप्टेंबर रोजी उदघाटन सोहळा

Sep 8, 2016

 

dsc03878
पुणे :
पुण्याच्या गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेल्या ‘पुणे फेस्टिव्हल’च्या कार्यक्रमांना दि. ६ सप्टेंबरपासून प्रारंभ होत असून, यावर्षी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खा. दिग्विजयसिंग, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, राहुल बजाज ,उद्योगपती, ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर, पालकमंत्री (पुणे जिल्हा) गिरीश बापट यांच्या प्रमुख उपस्थितीत ९ सप्टेंबर रोजी उदघाटन सोहळा होणार आहे.
यावेळी महापौर प्रशांत जगताप, उपमहापौर मूकारी अलगुडे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, डॉ. के. एच. गोविंदाराज (व्यवस्थापकीय संचालक, एमटीडीसी) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याशिवाय संजय खान, शेखर सुमन, सुरज पांचोली, नेहा पेंडसे, मल्लिका शेरावत, पुजा हेगडे हे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती ‘पुणे फेस्टिव्हल’चे संस्थापक,अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला मुख्य संयोजक कृष्णकांत कुदळे, डॉ. सतीश देसाई, सुभाष सणस, पी. ए. इनामदार, आबेदा इनामदार, मोहन टिल्लू, रवींद्र दुर्वे, श्रीरंग गोडबोले, सुप्रिया ताम्हाणे, दीपाली पांढरे, प्रसन्न गोखले, अनुराधा भारती इत्यादी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील ‘फेस्टिव्हल्स’ची जननी मानल्या जाणार्‍या या ‘पुणे फेस्टिव्हल’ चे हे २८ वे वर्ष आहे. दि . ५ ते १५ सप्टेंबर दरम्यान होणार्‍या ‘पुणे फेस्टिव्हल’मध्ये अनेक रंगारंग,वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचा समावेश आहे. ‘ पुणे फेस्टिव्हल कमिटी ‘, पुणेकर नागरिक , भारत सरकारचा पर्यटन विभाग , महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ,यांच्या सहकार्याने ‘पुणे फेस्टिवल २०१६’चे आयोजन करण्यात आले आहे.

‘पुणे फेस्टिव्हल’च्या ‘श्री गणेशाची प्रतिष्ठापना’ नेहरू स्टेडियमच्या ‘सारस हॉल’मध्ये ५ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे. यावेळी अभिनेत्री भार्गवी चिरमुले आणि अनुजा साठे उपस्थित राहणार आहेत.
६ सप्टेंबरपासून फेस्टिव्हलच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रारंभ होत असून, फेस्टिव्हलचा उदघाटन सोहळा ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.०० वाजता गणेश कला क्रीडा केंद्र येथे होणार आहे.
यावर्षीचा ‘पुणे फेस्टिव्हल पुरस्कार’ ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे आणि हृदयशस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. रणजित जगताप यांना या सोहळ्यात देण्यात येणार आहे .
उदघाटन सोहळ्यात तुकाराम दैठणकर यांचे सनईवादन, अरुंधती पटवर्धन, तेजस्विनी साठे, प्रचिती डांगे ‘कथक, भरतनाट्यम् आणि ओडिसी’ नृत्य यांचा संगम असलेली गणेश वंदना सादर करणार आहेत. लोकमान्य टिळक यांच्या ‘स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे’ या सिंहगर्जनेच्या शताब्दीनिमित्त कार्यक्रम, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षनिमित्त गौरव गीत सादर केले जाणार आहे. ‘कलरफुल लावणी’ या कार्यक्रमाची संकल्पना व नृ कात्य दिग्दर्शन निकिता मोघे यांचे असून यामध्ये अभिनेत्री वर्षा उसगावकर, भार्गवी चिरमुले,अनुजा साठे, तेजस्विनी लोणारी,गिरीजा जोशी, सुशांत शेलार यांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या उत्सवांवरील ‘ फेस्टिव्हल्स ऑफ महाराष्ट्र ‘ कार्यक्रमाची संकल्पना व नृत्यदिग्दर्शन संतोष संखद यांचे असून अनिकेत विश्‍वासराव, अभिजित केळकर ,स्मिता शेवाळे, तितिक्षा तावडे यांचा यामध्ये समावेश आहे.
उदघाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश देशपांडे ,देविका नाडिग करणार आहेत .
‘उत्सव एक -अविष्कार अनेक’ असे बोधवाक्य असलेल्या ‘पुणे फेस्टिव्हल’ मध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, छायाचित्र प्रदर्शन, नृत्य, गायन, ‘गणेश शरणम्’ कर्नाटकी शास्त्रीय संगीत नंदिनी राव -गुजर आणि सहकारी सादर करणार आहेत अशा अनेक उपक्रमांचा समावेश आहे.
‘ऑल इंडिया उर्दू मुशायरा’, धनंजय दैठणकर -रामदास पळसुले -राजेंद्र कुलकर्णी यांची तबला-संतुर- बासरी यांची जुगलबंदी, अरुण काकतकर यांचा ‘नक्षत्रांचे दिवस’ हा कार्यक्रम, डॉ. गिरीश ओक -हेमांगी कवी यांची भूमिका असलेले ‘ती फुलराणी’ हे नाटक, ‘मराठी कवी संमेलन’या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास फुटाणे करणार आहेत, ‘मिस पुणे फेस्टिव्हल स्पर्धा’, एकपात्री कलाकारांचा ‘हास्योत्सव’, हिंदी सिनेमातील कपूर घराण्याच्या कार्य कर्तृत्वाचा वेध घेणारा ‘कपूर्स डायरी’ कार्यक्रम, गजाननराव वाटवे यांच्या जन्म शताब्दीनिमित्त ‘गगनी उगवला सायंतारा’ या भावगीत गायनाचा कार्यक्रम, कर्नाटकी शास्त्रीय संगीत, ‘व्हॉइस ऑफ पुणे फेस्टिव्हल’ ही गायन स्पर्धा, ‘शिव -ओम ‘कथक बॅले यास्मिन सिंग ,रायपूर आणि सहकारी सादर करणार आहेत , ओडिसी नृत्य, मंगळागौर स्पर्धा, जुन्या -नव्या हिंदी गाण्यांचा ‘बॉलिवूड हंगामा’,लावणी महोत्सव, महिला कलाकारांच्या पेंटिंग स्पर्धा आणि प्रदर्शन, ‘उगवते तारे’, ‘इंद्रधनू’, ‘केरळोत्सवम’असे भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम आहेत.
शिवाय ‘कुस्ती’ स्पर्धा, ‘गोल्फ’, ‘रोल बॉल’ स्पर्धा, ‘चित्रकला’ स्पर्धा , ‘मेंदी -उखाणे -पाककला’ स्पर्धा असलेला ‘महिला महोत्सव’ अशी या वेळच्या ‘पुणे फेस्टिव्हल’ची वैशिष्ट्ये आहेत. मराठीच्या भाषा भगिनी असलेल्या मल्याळी, केरळी, कर्नाटकी, भाषेतील कार्यक्रमांचाही ‘पुणे फेस्टिव्हल’मध्ये समावेश आहे. ‘झी मराठी’चा ‘गणा धाव रे ‘ , ‘झी टॉकीज’चा याड लागलाय , ‘झी क्लासिक’ या वाहिन्यांचे कार्यक्रमही या वर्षीचे वैशिष्ट्य आहे. हे कार्यक्रम गणेश कला क्रीडा केंद्र, बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे होतील.
‘पुणे फेस्टिवल २०१६’चे मुख्य प्रायोजक झी मराठी’,झी टॉकीज,झी क्लासिक हे आहेत. सहप्रायोजक नेक्सा (औंध -बाणेर ) , जमनालाल बजाज फौंडेशन आहेत, तर असोसिएट प्रायोजक ऍडव्हीक हाय टेक प्रायव्हेट लिमिटेड , भारत फोर्ज , येस बँक ,पंचशील, नॅशनल एग को -ऑर्डिनेशन कमिटी आहेत.

Deepak Bidkar : 9850583518
Gauri Bidkar: 9822036163
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Prabodhan M a d h y a m
(News,Features,Media Relations,publication,Events,Production House)
देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे …!
Celebrating 13 YEARS OF PRabodhan

Read More

पुणे फेस्टिव्हल ‘ श्रीगणेशाची सुरेश कलमाडी ,भार्गवी चिरमुले यांच्याहस्ते आरती

Sep 8, 2016

dsc03874-1

२८ व्या वर्षात पदार्पण केलेल्या ‘पुणे फेस्टिव्हल ‘ च्या श्री गणेशाची प्रतिष्ठापना नेहरू स्टेडियम च्या सारस हॉल मध्ये सोमवारी सकाळी १० वाजता झाली .
‘पुणे फेस्टिव्हल ‘ चे संस्थापक ,अध्यक्ष सुरेश कलमाडी ,अभिनेत्री भार्गवी चिरमुले ,अनुजा साठे यांच्या हस्ते आरती करण्यात आली . अनिकेत पत्की गुरुजी यांनी विधिवत पूजा सांगितली .

,कृष्णकांत कुदळे ,पी ए इनामदार ,डॉ सतीश देसाई ,आबेदा इनामदार ,रवींद्र दुर्वे ,प्रसन्न जगताप ,निकिता मोघे ,माधवी मोरे ,काका धर्मावत ,बाळासाहेब आमराळे यांची प्रमुख उपस्थिती होती . भार्गवी चिरमुले ,अनुजा साठे ,निकिता मोघे ,माधवी मोरे यांचा सत्कार सुरेश कलमाडी यांच्या हस्ते करण्यात आला मंगळवार दिनांक ६ सप्टेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे दुपारी १२ ते ७ या वेळेत ‘महिला महोत्सव ‘ आयोजित करण्यात आला आहे . ‘मंगळागौर नृत्य स्पर्धा ही होणार आहेत . उगवत्या बाल कलाकारांचा ‘उगवते तारे ‘ हा कार्यक्रमही मंगळवार दिनांक ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे होणार आहे . ज्येष्ठ नृत्यांगना रोशन दाते यांचा सत्कार करण्यात येणार आहे ,अशी माहिती रवींद्र दुर्वे यांनी दिली .
उगवते तारे ‘ कार्यक्रमाचा दुसरा भाग ७ सप्टेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी ४ ते ७ या वेळेत होणार आहे

Read More

Festival Schedule

Sep 7, 2016

punefest-2016-schedule-event-calendar-01

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

punefest-2016-schedule-event-calendar-02

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

punefest-2016-schedule-event-calendar-03

Read More